|
 | | | | |
|
धन्यवाद
 |
राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारूदत्त गोविंदस्वामी आफळे:
मराठी विषय घेऊन बी. ए. तसेच संगीत विषय घेऊन एम. ए. पदवी प्राप्त केली. शालेय वयापासून त्यांनी संगीत नाटकातून विविध भूमिका केल्या. सादर केलेली नाटके : कट्यार काळजात घुसली, शाकुंतल, सौभद्र, संशयकल्लोळ, मानापमान, कान्होपात्रा, विद्याहरण, मत्स्यगंधा, लावणी भुलली अभंगाला, आतून कीर्तन वरून तमाशा, ईथे ओशाळला मृत्यू, तो मी नव्हेच. या नाट्य सेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले - पुणे मराठी ग्रंथालयाचा पाटणकर पुरस्कार, गोवा माशेल संघाकडून सुवर्णपदक, अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून पलुस्कर पुरस्कार, सन २००२ मध्ये पुणे की आशा पुरस्कार आणि सन २००३ साली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार. आफळे घराण्याचा मूळ वसा कीर्तन, यातही बुवांचे नाव आघाडीचे कीर्तनकार म्हणून आहे. १९८८ ते २००८ ह्या वीस वर्षात त्यांनी ३००० च्या वर कीर्तने सादर केली आहेत. त्यांची महाराष्ट्र, गुजराथ, बंगाल, कर्नाटक, दिल्ली सर्वत्र कीर्तने होत असतात. कीर्तनासाठी दोन वेळा अमेरिका एकदा कॅनडा तर एकदा ऑस्ट्रेलिया दौराही त्यांनी केला आहे. डि. डि. १० चॅनेलवरील गणेशदर्शन मालिकेत त्यांची कीर्तने झाली. तारा चॅनलवर महिनाभर त्याची प्रवचने झाली. ई. टिव्ही मराठी वर २ महिने सलग त्यांची मनोबोधावर प्रवचने झाली. स्टार माझा चॅनलवर पंढरीचे वारी निमित्त महिनाभर कीर्तन झाले.स्लाईड शोची मदत घेऊन ऎतिहासिक कथा व संतकथा विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय करण्याचे कार्य ते आजही करत आहेत. |
 |
श्री. मोहन बळवंत बांडे:
श्री मोहन बांडे यांचा जन्म इंदौर (म.प्र.) येथे १९४७ साली झाला. त्यांनी वनस्पतीशास्त्र या विषयात एम.एस.सी. व नंतर डॉक्टरेट (पी.एच.डी) प्राप्त केली. लखनौ येथील बिरबल सहानी पुरावनस्पती विज्ञान (पॅलिओबॉटनी) संस्था हे डॉ मोहन बांडे यांचे प्रमुख कार्यक्षेत्र. या संस्थेत १९७२ पासून ते १९९३ पर्यंत त्यांनी वैज्ञानिक म्हणून काम केले. पुरावनस्पती विज्ञानातील संशोधनकार्यासाठी पॅलिओबॉटनीकल सोसायटी तर्फे सन्माननीय सदस्यत्व (फेलोशिप) देऊन डॉ बांडे यांना गौरवण्यात आले. १९९३ साली लखनौच्या आपल्या संस्थेचे सहाय्यक संचालकपद भूषवित असतानाच डॉ बांडे यांनी संतवाङ्मयाचाही अभ्यास चालू ठेवला. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदान, अमृतानुभव खंड १ व २ आणि ज्ञानेश्वरीचा सातवा अध्याय अशा रचनांचा त्यांनी हिंदीत पद्यानुवाद करून तो पुस्तकरुपाने प्रकाशितही केला. डॉ वि.रा. करंदीकर लिखित ‘तीन सरसंघचालक’ या मुळ मराठी पुस्तकाचेही हिंदी भाषांतर त्यांनी केले. वरिष्ठ गुहेचे संत स्वामी पुरुषोत्तमानन्दजी महाराज यांचे जीवनचारित्र त्यांनी लिहिले. समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनकार्यावर व विचारांवर आधारित ‘राष्ट्र्गुरु श्री समर्थ रामदास’, ‘दासबोध दर्शन’ आणि ‘विद्यार्थियों के श्री समर्थ रामदास’ ही हिंदी भाषेतील पुस्तकेही डॉ मोहन बांडे यांनी लिहिली आहेत.
|
 |
प्राचार्य शिवाजीराव भोसले
प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणजे महाराष्ट्रातील सरस्वतीचा पुत्र. १५ जुलै १९२७ या दिवशी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कलेढोण या गावी त्यांचा जन्म झाला. सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलला त्यांचे विद्यालयीन शिक्षण झाले तर पुणे येथे स.प.महाविद्यालय आणि वाडिया महाविद्यालय येथे त्यांचे महविद्यालयीन शिक्षण झाले. एम.ए., एल.एल.बी झाल्यावर थोडे दिवस त्यांनी वकिली केली पण वकिली व्यवसायात त्यांचे मन रमेना. फलटणच्या मुधोजी महाविद्यालयात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ते दाखल झाले. अनेक वर्षे महाविद्यालयातील प्राचार्यपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. निवृत्तीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते तीन वर्ष कुलगुरू होते. सर्वश्रेष्ठ वक्ता म्हणून महाराष्ट्रात ते प्रसिध्द आहेत. भाषणाची स्वत:ची एक शैली त्यांनी निर्माण केली. आज महाराष्ट्रातील अनेक वक्ते त्यांच्या या शैलीचे अनुकरण करतात. खुसखुधीत विनोद, प्रसन्न मुद्रा, लांब पल्ल्याची अनुप्रासात्मक वाक्ये, कोणत्याही विषयावर उत्स्फूर्त वक्तृत्व यामुळे ते महाराष्ट्रात लोकप्रिय ठरले. वक्तृत्वाकडून ते लेखनाकडे वळले. दीपस्तंभ, जागर या त्यांच्या सकाळमधील लेखमाला चांगल्याच गाजल्या.
|
 |
समर्थव्रती सुनील चिंचोलकर
जन्म - १४ मार्च १९५१. मूळ गाव मनमाड, बारामती केंद्रातून बी. कॉम. प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तीन वर्षे वालचंदनगरला शिक्षकाची नोकरी केली. १९७७ ते १९८८ सज्जनगडावर समर्थ सेवा मंडळाचे व्यवस्थापक आणि सज्जनगड मासिकाचे संपादक म्हणून सेवा केली. रामदास स्वामी संस्थानचे सल्लागार व समर्थ व्यासपीठाचे अध्यक्ष म्हणून काम केले. आजपर्यंत त्यांची २५ पुस्तके प्रसिध्द झाली. प्रत्येक पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. ‘संस्कारांचे मोती’ या २५ व्या पुस्तकाच्या आठ हजार प्रती एकाच वर्षात संपल्या आहेत. त्यानी आतापर्यंत आठ हजाराहून अधिक प्रवचने केली आहेत. महाराष्ट्रात मराठीतून आणि महाराष्ट्राबाहेर हिंदीतून प्रवचने केली. त्यांनी संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, संत तुकाराम, संत कबीर, संत मीराबाई, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी, रामायण, श्रीमद् भगवद्गीता, उपनिषदे, नारदभक्ती सूत्रे, ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी, ग्रंथराज दासबोध या विविध विषयांवर प्रवचने केली. त्यांना समर्थ व्यासपीठाचा शिवसमर्थ पुरस्कार, ओंकार ट्र्स्टचा वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार तसेच रामदास स्वामी संस्थानचा समर्थ रामदास पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे रामाकृष्ण मठ, बाबा महाराजसमाधी मंदिर, वेदव्यास प्रतिष्ठान या संस्थांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत तसेच तेथील सत्पुरुषांचे आशीर्वाद त्यांना लाभले आहेत
|
 |
प्राध्यापक लक्ष्मण हर्दवाणी
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी भारताची फाळणी झाल्यानंतर जीव मुठीत धरून काही हिंदू कुटुंबे आश्रयासाठी भारतात परतली. प्रा. लक्ष्मण हर्दवाणी बालपणीच महाराष्ट्रात अहमदनगर येथे आले. हर्दवाणी घराण्यात व्यापाराची परंपरा होती पण यांनी ज्ञानदानाची परंपरा स्वीकारली. अहमदनगर कॉलेजला आदर्श प्राध्यापक म्हणून त्यांनी नावलौकीक मिळवला. ‘मराठी माणसाने आपल्याला आश्रय दिला, आपण मराठी माणसाला काय देऊ शकतो?’ या विचाराने ते अस्वस्थ झाले. त्यांनी ज्ञानेश्वरी, दासबोध आणि तुकाराम महाराजांचा गाथा याचा सिंधी भाषेत अनुवाद करून त्याच्या प्रत्येकी एक हजार प्रती छापल्या आणि आपल्या सर्व सिंघी बांधवांना त्या भेट म्हणून वाटल्या. त्यानंतर मनाचे श्लोक आणि समर्थांची करूणाष्टके यांचा सिंधी अनुवाद केला. पुण्याच्या ‘समर्थ व्यासपीठ’ या संस्थेने त्याच्या १००० प्रती छापून सिंधी बांधवांना भेट दिल्या. अत्यंत निगर्वी, प्रसिद्धी पराङ्मुख आणि मधुरभाषी प्रा. लक्ष्मण हर्दवाणी यांनी मराठी माणसाचे ऋण अशा प्रकारे फेडले आणि राष्ट्रीय एकात्मतेचा आदर्श प्रस्थापित केला.
|
 |
श्री चिंतामणी हसबनीस
श्री चिंतामणी हसबनीस हे व्यक्तिचित्रासाठी (पोट्रेट) प्रसिद्ध असलेले पुण्याचे चित्रकार. अभिनव कला महाविद्यालय पुणे, येथूनच त्यांनी पदवी घेतली. रामदास स्वामींचे या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील (वेबसाइटच्या होमपेज वरील) चित्र श्री. हसवनीस यांनीच काढले आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. (ब्रश ऍंड माउस ऍट जी मेल डॉट कॉम) हा त्यांचा इ मेल पत्ता आहे.
|
 |
श्री प्रसाद जोशी
श्री प्रसाद जोशी यांनी तबलावादनात बी.ए. च्या श्रेणीची विशारद ही पदवी मिळवली आहे. उस्ताद अल्लरखॉं आणि पंडित जी.एल. सामंत यांच्याकडून त्यानी तबलावादनाचे शिक्षण घेतले. अनेक थोर शास्त्रीय गायकांना त्यांनी साथ दिली उदा. पं भीमसेन जोशी, श्री अजित कडकडे, पं उल्हास कशाळकर, पं विजय कोपरकर, श्री रामदास कामत, श्री संजीव अभ्यंकर, सौ. आरती अंकलीकर - टिकेकर. सुगम संगीतासाठी श्री प्रसाद जोशी यांनी तबलावादनाची साथ दिली आहे ती पं. ह्रुदयनाथ मंगेशकर, श्रीमती उषा मंगेशकर, श्री सुरेश वाडकर, साधना सरगम, सौ. अनुराधा पौडवाल, श्री अरुण दाते, पं. प्रभाकर जोग, कु. बेला शेंडे अशा विविध गायक गायिकांना. श्री प्रसाद जोशी यांनी संगीत नाटकांच्या ५०० हून अधिक प्रयोगांमध्ये तबलावादन केले आहे. सं. कट्यार काळजात घुसली, सं. सौभद्र, सं. शरदा, सं. मानापमान ही त्यापैकी प्रमुख नाटके. २०० हून अधिक तालरचना त्यानी रचल्या आहेत. नुकताच ‘ग्लिंप्सेस’हा त्यांचा म्युझिकल अल्बम प्रसिद्ध झाला. १९९६ सालीच त्यांना महाराष्ट्र राज्याचा तबलावादनासाठीचा पुरस्कार मिळाला होता.
|
 |
डॉ. जगदीश मार्तंड करमळकर
(बी. ए. एम. एस., बी ए एम)
१९७७ पासून पुण्यातील रविवार पेठेत स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय आहे. गेली २८ वर्षे पुण्याजवळील वाघोली येथे देखील स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय आहे. वेळू, गोगलवाडी, लोणी काळभोर, थेऊर या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा करतात. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पर्वती भागाचे संघचालक आहेत. अक्षय सेवा प्रतिष्ठान या संस्थेचे तसेच पासोड्या विठोबा विठ्ठल मंदिराचे विश्वस्त म्हणून ते काम पाहातात. रविवार पेटेतील दुर्जनसिंग पागा या उपेक्षित वस्तीमध्ये तरुणांच्या चारित्र्यनिर्मितीसाठी गेली २५ वर्षे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करतात.
‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’, ‘समर्थ रामदास व संत तुकाराम’ ही त्यांची पुस्तेके प्रकाशित झाली आहेत. ‘परंपरेमागील विज्ञान’ या विषयावर नाशिक येथील वसंत व्याख्यानमालेत त्यांचे व्याख्यान झाले आहे. तसेच ते ‘सूर्यनमस्कारांचे महत्व’, ग्रंथ दासबोध, भगवद्गीता यांसारख्या विषयांवर व्याख्याने व प्रवचने करतात.
|
 |
डॉ.विनीता महाजनी
डॉ विनीता महाजनी यांनी मुंबई विद्यापीठातून जर्मन साहित्यात डॉक्टरेट (पी.एच.डी.) प्राप्त केली. त्यांनी पुण्याच्या फर्गुसन महाविद्यालयात जर्मन भाषेच्या प्राध्यापिका म्हणून सेवा बजावली. त्यांनी दोन मराठी कवितासंग्रह, बालकथा, जर्मन - मराठी आणि मराठी - जर्मन भाशांतरित साहित्य असे विविधांगी विपुल लेखन केले आहे. ‘केल्याने देशाटन’ या उक्तीला अनुसरून त्यांनी अनेक देशांना भेटी देऊन तेथील लोकजीवन आणि संस्कृतीचा अनुभव घेतला आहे. डॉ. विनीता महाजनी यांनी बहुरंगी भारत संस्कृतिक मंचाची स्थापना केली आणि या मंचाद्वारे पुणे, जर्मनी, स्वितझर्लंड, मॉरिशस येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे ६० हून अधिक प्रयोग सादर केले. या कार्यक्रमातुन भारतीय संस्कृती, परंपरा, भाषा आणि कलांच्या विविध पैलूंचे मनोज्ञ दर्शन घडते.
|
 |
श्री.श्रीनिवास रायरीकर
श्री श्रीनिवास रायरीकर यांनी वाणिज्य व व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून कायद्याची पदवीही घेतली आहे. आय.एस.ओ. ९००१ साठी ते एक प्रमुख लेखापरीक्षक (ऑडिटर) आहेत. जपानच्या कर्मचारी व्यवस्थापन आणि मानव संस्थापन व्यावस्थापनातील दोन आन्तरराष्ट्रीय शिष्यवृत्ती त्यांना मिळाल्या आहेत. त्यांनी रशिया, युरोप, पाकिस्तान, जपान, सिंगापूर, ट्युनिशिया इत्यादी देशांचे अभ्यासदौरे केले आहेत. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ऍंड ऍग्रिकल्चर मध्ये गेली २६ वर्षे ते काम करत आहेत आणि सध्या ‘ज्येष्ठ संचालक, मानव संसाधन विकास प्रमुख, दर्जा नियंत्रण, आय.एस.ओ. ९००१’ या पदावर आहेत.
अभ्यागत अध्यापक ( व्हिजिटिंग फॅकल्टी मेंबर ) या नात्याने अनेक व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांसाठी ते काम करतात. चित्रकला (पेंटिंग), गायन, काव्यरचना आणि ध्यान-धारणा हे त्यांचे छंद आहेत.
|
 |
डॉ.सुषमाताई वाटवे
डॉ. सुषमाताई वाटवे यांचा जन्म जमखंडी येथे १९२८ साली झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून डी.ए.एस.एफ व पुणे विद्यापीठातून एम.ए. ची पदवी संपादन केली. त्यांनी १९५० ते १९८४ मध्ये पुण्यात वैद्यकीय व्यवसाय केला. तसेच विविध सामाजिक संस्थातून वैद्यकीय सल्लागार म्हणून त्यांनी विनामूल्य सेवा केली. त्यांनी आकाशवाणी, मासिके, वृत्तपत्रे, व्याख्याने अशा विविध माध्यमातून स्त्रीजीवन, बालजीवन, आरोग्य, आहार, इत्यादी विषयांवर लेखन केले. त्यांचे ‘ कशी मी? अशी मी!’ हे वैद्यकीय व मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून स्त्री जीवनावर पुस्तक प्रकाशित झाले आहे. १९७२ पासून या पुस्तकाच्या ९ आवृत्या निघ्याल्या आहेत. १९७३ पासून त्यांच्या जीवनाला आध्यात्मिक वळण लागले. त्यांनी परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, पांवस व परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पारमार्थिक साधना केली. तसेच भगवद्गीता, श्रीज्ञानेश्वरी, श्रीदासबोध आदी ग्रंथांवर प्रवचने व ग्रंथलेखन केले. त्यांनी स्वामी माधवनाथांच्या प्रवचनांच्या शेकडो ध्वनिफिती केल्या व त्याच्या आधारे सद्गुरूंच्या आज्ञेवरून आत्तापर्यंत साठवर ग्रंथांचे लेखन व प्रकाशन केले. ‘सार्थक वाटे झालिया वेचाचे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी १९८४ साली संसार व वैद्यक व्यवसायातून पूर्ण निवृत्ती घेतली व त्या पश्चात पारमार्थिक कार्य व साधना केली. १९९६ साली स्वामी माधवनाथांच्या पश्चात त्यांनी ग्रंथलेखन, प्रवचने, पारमार्थिक मार्गदर्शन, ऑडिओ, व्हिडिओ कॅसेट्स द्वारा शुद्ध परमार्थाचा स्वतंत्रपणे प्रसार केला आहे.
|
|
स्वरप्रिया बेहेरे
स्वरप्रिया बेहेरे : माहितीची वाट पाहात आहोत.
|
|
मांडके सर
मांडके सर : माहितीची वाट पाहात आहोत.
|
|
श्री दत्तात्रय महुरकर
श्री दत्तात्रय महुरकर : माहितीची वाट पाहात आहोत.
|
|
प्रोफेसर मनोहर राईलकर
प्रोफेसर मनोहर राईलकर : माहितीची वाट पाहात आहोत.
|
 |
डॉ. रामचंद्र देखणे
B. Sc., M.A., Ph.D.
संत साहित्याचे व
लोकवाङ्मयाचे अभ्यासक, व्याख्याते,
प्रवचनकार, भारूडकार.
लेखन : ३७ पुस्तके,
१५०० हुन अधिक लेख, अनेक वृत्तपत्रांमध्ये
लेखमाला. विशेष उल्लेखनीय : दै. लोकसत्ता
मधील ‘आनंद-तरंग’ आणि दै. सकाळ मधील
‘माहेर पंढरी’
प्रबंध : पुणे
विद्यापीठ मान्यताप्राप्त पी. एच् डी.
साठी ‘भारूड वाङ्मयातील तत्वज्ञान’.
दूरदर्शन व
आकाशवाणीवरून शेकडो कार्यक्रमांचे
सादरीकरण. विशेष उल्लेखनीय - गीत
ज्ञानेश्वरी.
बहुरूपी भारुडाचे
११०० हुन अधिक कार्यक्रम आणि विविध
व्याख्यानमालांमधून हजारो व्याख्याने.
संशोधकीय आणि
सांस्कृतिक कार्यासाठी १०० हुन अधिक
पुरस्कार प्राप्त. विशेष उल्लेखनीय :
महाराष्ट्र शासनाचा २००३ चा संस्कृतिक
राज्य पुरस्कार, आशियायी मानव संसाधन
विकास संस्थेचा स्वामी विवेकानंद
पुरस्कार, गदिमा साहित्य पुरस्कार,
सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार, म. सा. प.
ग्रंथ पुरस्कार, आचार्य अत्रे
प्रतिष्ठानचा कलावंत पुरस्कार.
राळेगण सिद्धी
(२००४) येथील पहिल्या ग्रामजागर साहित्य
संमेलनाचे अध्यक्षपद तसेच कडोली, सासवड व
सटाणा येथील विविध साहित्य संमेलनांचे
अध्यक्षपद, २००९ साली अमेरिकेत झालेल्या
विश्व मराठी साहित्य संमेलनात परिसंवादाचे
अध्यक्षपद.
पिंपरी चिंचवड
प्राधिकरणात ‘जनसंपर्क व प्रसिद्धी
अधिकारी; वर्ग १’ या पदावर कार्यरत.
|
 |
धन्यवाद नीती सोल्युशन्स , आम्ही आभारी आहोत. |
|
|
|
|